InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची आघाडी आमदाराच्या घरी भेट- काँग्रेसच्या अडचणीत वाढ

- Advertisement -

आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरात असले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या घरी भेट दिली आणि पाहुणचार घेतला. यावेळेस गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री विजय कुमार देशमुख, खासदार रणजितसिंह निंबाळकर उपस्थित होते. भालके गेली काही दिवस विखे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते भाजपचा हात धरतील अशी शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होणार आहे.

भालके यांचे साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत, भविष्यात सरकारची आर्थिक मदत मिळाली नाही तर अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे भालके हे भाजपामध्ये जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे सत्तेशी जवळीक साधून भालके आपलं राजकीय भविष्य स्थिर करतील असं म्हटलं जातं.

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.