China vs Taiwan | मोठी बातमी : चीनने तैवानवर 11 क्षेपणास्त्रे डागली, पण त्यातील 5 जपानमध्ये पडली

China vs Taiwan | महाराष्ट्र देशा डेस्क : अमेरिका आणि चीनमध्ये तैवानवरुन तणाव वाढतच चालला आहे. दरम्यान, चीनने तैवानच्या आजूबाजूच्या समुद्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केला आहे. तैवानच्या आजूबाजूच्या सहा झोनमध्ये थेट फायर करत सराव सुरु केल्याने चीन कधीही हल्ला करु शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन आक्रमक झाला आहे. त्यामुळेच चीनने गुरुवारी तैवानला घेरून आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केला आहे.

तैवानला वेढा घालताना चिनी लष्कराने त्याभोवती 6 ‘नो एंट्री झोन’ घोषित केले आहेत. ज्यामुळे आता या मार्गाने कोणतेही प्रवासी विमान किंवा जहाज तैवानला जाऊ शकत नाही. लष्करी सरावादरम्यान चीनने आपल्या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौका, अण्वस्त्रधारी सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, स्टेल्थ फायटर जेट्स, गुप्तचर विमाने तसेच विमानविरोधी तोफा आणि हल्ला करणाऱ्या युद्धनौकांचे शक्तीप्रदर्शन केले आहे. यानंतर पुढे आता नवीन अपडेट माहिती मिळाली आहे.

यामध्ये आता चीनने एक पाऊल पुढे जात तैवानवर 11 क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे. तैवान सरकारने याला दुजोरा दिला आहे. ही क्षेपणास्त्रे तैवानच्या आजूबाजूच्या भागात पडली. पण यापैकी काही क्षेपणास्त्रांचे लँडिंग जपानमध्ये झाल्याचे बोलले जात आहे. जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनने डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी 5 क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडली आहेत. ही देशाच्या सुरक्षेशी संबंधित बाब आहे, जापानी नागरिकांच्या सुरक्षेशी आम्ही तडजोड करणार नाही.

दरम्यान, याआधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याने गुरुवारी दुपारी तैवानच्या आसपासच्या समुद्रांमध्ये लष्करी सराव सुरू केला. चीनच्या सैन्याने समुद्रात लाइव्ह फायर सराव केला आहे. हा सराव गुरुवारी दुपारी 12 वाजता सुरू झाला असून तो 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अनेक ठिकाणी चीन तैवानच्या भूमीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर लष्करी सराव करत आहे. यामध्ये चीनचे हवाई दल, लष्कर आणि नौदलाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.