एक-दोन मीडिया हाऊसला चीनचे आर्थिक साहाय्य; फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई : संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोन टॅपिंगवरुन काँग्रेसनं जोरदार गोंधळ घातला. पेगसास स्पायवेअरद्वारे राजकीय नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या आल्याने देशभर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगवरून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच आरोप केले.

अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून प्रयत्न होत आहे. इतकंच नाही तर एक-दोन मीडिया हाऊसला चीनचे आर्थिक साहाय्य मिळत आहे. त्याच्या माध्यमातून मोदी सरकारला बदनामीचा अंजेडा राबवला जात असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी उपलब्ध करुन दिली. अशावेळी अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याच्या उद्देशानं प्रयत्न केला जात आहे.

काही मीडिया हाऊसेसनी पेगाससच्या बातम्या प्रसारित केल्या. काही वृत्तपत्रांनी बातम्या छापल्या. काहींनी एक यादीही दिली. पण त्या बातमीला कुठलाही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीचं हॅकिंग करत नाही. आपल्याकडे असलेल्या टेलिग्राफ कायद्यानुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरजंच नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा