Chinchwad Election | कसबा निसटलं पण भाजपने चिंचवडची जागा राखली ; अश्विनी जगताप यांचा विजय

Chinchwad Election | चिंचवड : गेली अनेक दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. अशातच आता कसबा निवडणुकीच्या मतमोजणीत धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी कासब्यावर बाजी मारली आणि महविकास आघाडीचा झेंडा रोवला आहे. अशातच आता चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आगेकूच करताना दिसत आहेत. चिंचवड मतदार संघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) या 36,091 मतांनी विजयी झाल्या आहेत.

अश्विनी जगताप विजयी ; एक्झीट पोलचं भाकीत ठरलं खरं: 

रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा या दोन संस्थांच्या एक्झिट पोलनुसार कसब्यात भाजपला धक्का बसणार अस सांगितलं जातं होत. आणि तसंच झालं. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी होतील, असं सांगण्यात आलं आणि ते विजयी झाले आहेत. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी होणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सध्याच्या हाती आलेल्या निकालानुसार हे पोल खरे ठरले आहेत आणि अश्विनी जगताप यांचा विजय झाला असून चिंचवडमध्ये कमळ फुलताना दिसलं आहे.

महत्वच्या बातम्या