InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

चीनी सैनिकांनी सीमारेषा पार करुन भारतात घुसखोरी

चीनी सैनिकांनी सीमारेषा पार करुन भारतात घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. चीनी सैंनिकांना लडाखमध्ये सीमारेषा पार करुन सहा किमी आतमध्ये आल्याचं पाहण्यात आलं आहे. सीएनएन न्यूज १८ ने एका फोटोच्या हवाल्याने दावा केला आहे की, ६ जुलै रोजी चीनी सैनिक डेमचोक, कोयूल आणि डुंगटी परिसरात घुसले होते. यावेळी भारतीय जमिनीवर चीनी झेंडे फडकावण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे अशावेळी सीमारेषा पार करुन घुसखोरी करण्यात आली जेव्हा लदाखमधील काही लोक बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते.

याचवेळी चीनी सैंनिक तिथे पोहोचले आणि वाढदिवस साजरा करण्यापासून रोखलं.सीएनएन न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनी सैनिकांनी सीमारेषा पार केल्याची माहिती लडाखमधील माजी खासदाराने दिली.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply