Chitra Vagh | “सार्वजनिक ठिकाणी उघडं-नागडं…” ; राज्य महिला आयोगावर चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

Chitra Vagh | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला आहे. यांचा हा वादविवाद टोकाला पोहोचला आहे. यामध्ये दोघी आरोप-प्रत्यारोप करत आहे. हा वाद राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला आहे.

चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी राज्य महिला आयोगावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या आहेत, “महिला आयोगाची भाषा नको तर कृती हवी आहे. भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उघडं नागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? उर्फी जावेद अतिशय बिभत्सपणे रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी शरीरप्रदर्शन करत फिरतं आहे. माझा विरोध उर्फी जावेदला नाही तर तिच्या घाणेरड्या, ओघळवाण्या कपड्यांना आहे.” या उघडं नागडं फिरणाऱ्यांना लोकांना राष्ट्रीय महिला आयोगाचे समर्थन आहे का? असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर उत्तर देत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या,”आतापर्यंत राज्य महिला आयोगाकडे 10 हजार 907 तक्रारी आल्या आहेत. यापैकी आम्ही 9 हजार 520 तक्रारी सोडवल्या आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोग आपलं काम व्यवस्थित करत आहे. आयोगाने काय करावं हे कोणीही सांगायची गरज नाही, असा टोला देखील रूपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

प्रत्येकाला काय परिधान करावे याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने परिधान केलेले कपडे सर्वांनाच अश्लील वाटता असे नाही. त्यामुळे या बाबतीत आयोग वेळ वाया घालू शकत नाही, असं देखील रूपाली चाकणकर त्यावेळी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या