Chitra Wagh। “नाच्या, सुपारीबाज, भाडोत्रींच्या….” ; चित्रा वाघ भास्कर जाधवांवर चांगल्याच संतापल्या

(Chitra wagh) मुंबई : उद्धव ठाकरेंच्या समर्थक आमदारांपैकी एक असणाऱ्या भास्कर जाधवांनी भाजपच्या महाराष्ट्रातील उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची संजय राठोड (Sanjay Rathod) प्रकरणात नक्कल केली. यानंतर चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून माझ्या नादी लागू नका सांगत जाधवांवर जोरदार पलटवार केला. भास्कर जाधव यांचा सुपारीबाज भाडोत्री, असा उल्लेख चित्रा वाघ यांनी केला.

ओ….भास्करशेठ तुम्ही आधी आणि आता ही ‘नाच्या’ च काम चांगल करतां तेच करा”, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. “माझ्या नादी लागू नका, जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती. तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता तुमच्या? तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही तर आम्ही आमच्या जीवावर लढतो. याद राखा. आमच्याबद्दल बोलताना दहा वेळा विचार करा” असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे.

काय म्हणालेत भास्कर जाधव?

भास्कर जाधव म्हणाले की, संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद दिलं त्याच भाजपने पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या कारणावरून संजय राठोड यांच्यावर सातत्याने टीका केली होती. चित्रा वाघ तेव्हा रोज सकाळी टीव्हीसमोर यायच्या त्या प्रकरणावर बोलायच्या. ‘उद्धव ठाकरे साहेब, आम्ही तुम्हाला चांगलं मानतो. तुमच्याकडून तरी न्यायाची अपेक्षा आहे. या मुलीला न्याय द्या’, असं म्हणायच्या मग आज चित्रा वाघ कुठे आहेत? असा खोचक सवाल जाधव यांनी केला.

आज पूजा चव्हाणच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. कारण चित्रा वाघ यांच्या पक्षाच्या सरकारमध्येच संजय राठोड यांना सन्मानानं मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे”, असा टोला भास्कर जाधव यांनी चित्र वाघ यांना लगावला आहे. “त्या मुलीचा ज्या पद्धतीनं छळ झाला. ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली. त्या आत्महत्येच्या पाठीमागे संजय राठोडच आहेत अशा पद्धतीने भाजपाने महाराष्ट्रात आरोपाची राळ उठवली. ज्या संजय राठोडांना मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला त्यांनाच आज भाजपाचं सरकार येण्यासाठी सन्मानाने मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळाला,” असे भास्कर जाधव म्हटले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.