Chitra Wagh | इमानदारीने देशाची सेवा करणाऱ्या मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले; विरोधी पक्षाच्या बैठकीवर चित्रा वाघांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: पाटणा शहरामध्ये आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देशातील तमाम विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

आज होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीवर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ही बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), प्रफुल पटेल (Praful Patel) आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

Chitra Wagh’s tweet on opposition party meeting

“ही विरोधी पक्षाची महाआघाडी नसून महागठबंधन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिकपणे देशाची सेवा करत असतात. प्रामाणिकपणे काम करत असणाऱ्या मोदींच्या विरोधात हे सर्व ठग एकत्र आले आहेत. या ठगांना जनता धडा शिकवेल”, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या बैठकीत नक्की काय चर्चा होणार? याचा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. त्याचबरोबर या बैठकीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43PROXQ