Chitra Wagh | मुंबई : काल रात्री (1मे) मुंबईमधील बिकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ( Vajramooth Sabha) पार पडली. सभेला महाविकास आघाडीतील अनेक नेते हजर होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, ( Ajit Pawar) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad), नाना पटोले ( Nana Patole) संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरेसह ( Uddhav Thackeray ) सर्वांनीच शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपा-शिंदे गटावर टीका करताना भाजप हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि शिंदे गट हे सगळं बघण्याचं काम करत आहे, असं म्हटलं होत. तर आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ ( What did Chitra wagh say)
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून काल केलेल्या टीका- टिप्पनीला शिंदे – फडणवीस सरकारमधील नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जातं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरुवात केली आहे. परंतु, मुंबईची जनता सुज्ञ आहे. तुमच्या या भूलथापांना येथील जनता भीक घालणार नाही. तसचं पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीकाही केली. “उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई नाही आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही”. यामुळे त्यांनी मुंबईची काळजी करू नये. मुंबई सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सक्षम आहेत. त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळावं, मग मुंबईची काळजी करावी. अशा शब्दांत चित्र वाघ यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे तुम्ही जमीन दाखवण्याची भाषा करू नका. तुम्हाला आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आसमान दाखवलं आहे. चिखलात लोळवलंय आणि चीतपट पण केलंय. असं चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकाला उत्तर देताना म्हटलं आहे. तर काल रात्री महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये मुंबई आंदण मिळालेली नसून ती मराठी माणसाने लढून मिळविली आहे. याचप्रमाणे देशातील सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या भक्कम असणाऱ्या मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होत. तसचं त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारचा देखील चांगलाच समाचार घेतला.
महत्वाच्या बातम्या-
- National Housing Bank | नॅशनल हाऊसिंग बँक यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- PM Kisan Yojana | दुसऱ्याची शेतजमीन कसतं असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का पीएम किसान योजनेचा फायदा? जाणून घ्या
- Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
- Weather Update | राज्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट, पाहा हवामान अंदाज
- Ajit Pawar | अजित पवार भाजप मध्ये जाणार का? पवारांनीच दिले धडाकेबाज उत्तर