Chitra Wagh | उद्धव ठाकरे, चोराच्या उलट्या बोंबा मारू नका – चित्रा वाघ

Chitra Wagh | Mumbai: ठाकरे गटानं आज मुंबईत मोठा मोर्चा काढला आहे. आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू आहे. अपुरी नालेसफाई, दूषित पाणी पुरवठा, पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

Who was in power until now? – Chitra Wagh

ठाकरे गटाकडून आज मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चावरून चित्रा वाघ यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “उद्धव ठाकरे, चोराच्या उलट्या बोंबा मारू नका. पैसे खाऊन गेंड्याची कातडी झालेले तुमचे शिलेदार अनिल परब यांनी बीएमसीवर मोर्चा काढलाय. चुकीच्या पद्धतीने कंत्राट वाटप केले गेले, तेव्हा तुमचे हे परबराव होते कुठे? यांच्याकडे रिसॅार्टसाठी पैसा आला तरी कुठून? माझा सवाल आहे, आत्तापर्यंत सत्तेत कोण होतं? तुम्हीच ना… ”

“वारेमाप कंत्राटं वाटली तुम्ही… टक्केवारी घेतली तुम्ही… बक्कळ पैसे खाऊन ढेकर दिली तुम्ही…आणि आत्ता आंदोलन कोणा विरोधात करताय ? कोणाच्या फोनवरून कंत्राट वाटप केले गेले आणि टक्केवारीचा हिस्सा कुठे गेला याचे पुरावे आता बाहेर येऊ लागलेत, तेव्हा हा भाबडेपणाचा बुरखा घालून फिरताय होय! हा बुरखा लवकरच फाटेल, आणि तुमचा भामटेपणा उघड पडेल.. आता नौटंकी करायला ही काही हास्यजत्रा नाही..”, असही चित्र वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये ठाकरे गटाचा हा मोर्चा सुरू असताना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही आमने-सामने आले. यादरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाने या मोर्चाला काळे झेंडे दाखवले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3r8RLaY