Chitra Wagh | ऐसी कोई सगा नहीं, जिसे उद्धवजीने ठगा नही; चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आज आणि उद्या (17 जुलै आणि 18 जुलै) कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तर राज्यातून या बैठकीला आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना फसवलं असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
The headmaster of the goons is going from Kalanagar to the meeting of the opposition – Chitra Wagh
आज आणि उद्या होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. विरोधी यांच्या बैठकीला गुंडांचे मुख्याध्यापक (उद्धव ठाकरे) कलानगरमधून जात आहे, असं चित्रा वाघ यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंनी फसवला नाही, असा त्यांचा एकही नातेवाईक काही नाही. विरोधी पक्षाचे सगळे ठग आज आणि उद्या बंगळुरूमध्ये जमणार आहे. या बैठकीत गुंडांचे मुख्याध्यापकही कलानगरमधून जात असल्याचं बोललं जात आहे. ज्यांना पक्ष आणि आपली माणसं संभाळता आली नाही, त्यांनी विरोधकांची एकजुट बांधणी सुरू केली आहे. ही #महाबंधनाची महाआघाडी आहे.”
ऐसी कोई सगा नहीं , जिसे उद्धव जी ने ठगा नही..@uddhavthackeray
बेंगलुरु में विपक्ष के सभी ठग एकट्ठा होनेवाले है। कहा जा रहा है कि इस मीटिंग में ठगों का हेडमास्टर भी कलानगर से जा रहे है। जो पार्टी और अपने लोगों को संभाल नहीं पाए,
वे विपक्ष की एकता बनाने में लग गए.ये…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 17, 2023
दरम्यान, बंगळुरूमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीला आज शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार आज मुंबईमध्येच राहणार आहे. आज ते आपल्या आमदारांशी चर्चा करणार आहे. तर, उद्या ते विरोधी पक्षाच्या बैठकीला हजर (Chitra Wagh) असतील.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार का आहे गैरहजर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
- Bacchu Kadu | “बच्चू कडूंना मंत्रिपद…”; मुख्यमंत्री शिंदेंना कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र
- Rohit Pawar | धक्कादायक! पुण्यातील रोहित पवारांचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
- Sharad Pawar | विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवारांची अनुपस्थिती, अचानक का केला दौरा रद्द?
- Gatari Amavasya | भाजपतर्फे गटारीनिमित्त मोफत कोंबडी वाटप! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3K0XLt9
Comments are closed.