Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Chitra Wagh | बीड : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehbub Shekh) यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला होता. या प्रकरणात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आणि मेहबूब शेख यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. नंतर याच मुलीने घुमजाव करत भाजपच्या चित्रा वाघ यांनीच आपल्याला तसे आरोप करायला सांगितलं होतं असं म्हटलं होतं.

चित्रा वाघ 2021 मध्ये मेहबूब शेख यांचा उल्लेख बलात्कारी म्हणून केला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसणीचा दावा दाखल केला आहे. शिरूर कासार न्यायालयाने मेहबूब शेख यांचा दावा स्वीकृत केला आहे. मेहबूब शेख यांनी पन्नास लाख रुपयांचा दावा दाखल केला होता. या संदर्भात मेहबूब शेख यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

“संविधानाने बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलले नाही पाहिजे याचे ही नियम दिले आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणी त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल, स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल वक्तव्य करताना यापुढे विचार करा.

स्वतःला न्यायधीश समजणाऱ्या चित्रा वाघ यांनी शिरूर कासार येथे येऊन माझ्या विषयी जे बदनामी कारक वक्तव्य केले,त्याच्या विरोधात मी शिरूर पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली. त्याच्या नंतर शिरूर च्या न्यायालयामध्ये 499 आणि 500 प्रमाणे क्रिमिनल डीफामेशन ची खाजगी तक्रार दाखल केली. माननीय कोर्टाने 202 प्रमाणे पोलीस चौकशी करून त्या पोलिस चौकशी च्या अहवालाच्या नंतर सदरील तक्रारीची दखल घेऊन ते स्वीकृत केले आहे.

काही लोक जे स्वतःला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खुप शहाणे अस समजतात. त्या लोकांच्या विरोधात हे माझ्या न्यायालयीन लढाई चे पहिले पाऊल, आज कोर्टाने त्या मध्ये दखल घेतली आहे. स्वतःला अति हुशार समजणाऱ्याला आणि लोकांची बदनामी करत बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निश्चित पणाने कायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई शेवट पर्यंत लढली जाईल”, अशा आशयाची पोस्ट मेहबूब शेख यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.