Chitra Wagh | ठाकरेंना कायद्याची भाषा कळत नसेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे ट्युशन लावावेत- चित्रा वाघ

Chitra wagh | मुंबई : कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये कोर्टाने अनेक मुद्धे मांडले आहेत. उद्धव ठारेंनी (Uddhav thackeray) राजीनामा दिला नसता तर पुनर्विचार केला असता. तसचं राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ स्थापन काही दिवसांतच होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसचं निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला असल्याचं म्हंटल. याचप्रमाणे भाजप-शिंदेंवर देखील जोरदार टीका केली. त्याच्या या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh) यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ –

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, “उद्धव जी ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला. सुप्रीम कोर्टानं पण तेच सांगितलं आहे. जर तुम्हाला कायद्याची भाषा समजत नसेल तर आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, अशा शब्दांत खोचक टोला देखील चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगवाला आहे. तसचं त्यांनी अजित पवारांना सोनार म्हणत उद्धव ठाकरेसह नाना पटोलेवर देखील तिला केली.

( Chitra Wagh Commented On Uddhav thackeray)

तसचं अजित पवार यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता. याचप्रमाणे महाविकास आघाडीने लगेच नवीन अध्यक्ष बनवायला पाहिजे होता जर असं झालं असतं तर १६ आमदार अपात्र ठरले असते. त्यांच्या या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी टोला लगावत म्हटलं की, सतत सरकार पडण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा कांगावा करणाऱ्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलावं. नाना पटोले, उद्धव ठाकरे आता तुमचे कान सोनाराने (अजित पवार) टोचले आहेत. असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

 

You might also like