Chitra Wagh | “देशासाठी २ निरुपयोगी जीव”; चित्रा वाघ यांची तुषार गांधी, राहुल गांधींवर टीका
Chitra Wagh | मुंबई :काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते यांच्या पाठोपाठ मनसेकडूनही राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर निषेध व्यक्त केला जातोय. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आपण राहुल गांधींच्या मताशी सहमत नसल्याची भूमिका मांडली.
या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी राहुल गांधींचं समर्थन केल्यानंतर आता भाजपाकडून त्यांच्यावरही हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी आणि तुषार गांधी यांच्यावर निशाणा साधलाय.
“आपापल्या पणजोबांच्या पुण्याईवर जगणारे, देशासाठी २ निरुपयोगी जीव… अहो रुपम् अहो ध्वनीम्…”, असं चित्रा वाघ ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स वृत्तवाहिनीच्या बातमीचा संदर्भ देत चित्रा वाघ यांनी हे ट्विट केलं आहे.
आपापल्या पणजोबाच्या पुण्याईवर जगणारे, देशासाठी २ निरुपयोगी जीव…
अहो रुपम् अहो ध्वनीम्…@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJPMM4Maha pic.twitter.com/LJbymhH6X7— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 19, 2022
काय म्हणालेत राहुल गांधी?
सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. त्यांनी काँग्रेसविरोधात ब्रिटिशांसोबत काम करण्याचं मान्य केलं होतं. तसेच, ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.
काय म्हणालेत तुषार गांधी?
“राहुल गांधींनी मांडलेलं मत अगदी योग्य आहे. सावरकर एकेकाळी क्रांतीकारी होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि पूर्ण आयुष्य इंग्रजांशी ते इमानदार राहिले. हे आपण सांगण्यात काहीच चुकीचं नाही. सत्य सांगायचं धाडस असायलाच हवं. ते कुणी सांगत नसतील, तर ते सत्याला घाबरतात हे स्पष्ट दिसतं. ज्यांना सत्य माहिती आहे, त्यांनी जर सत्य लपवलं, तर सत्याशी त्यांनी निष्ठा नाहीये हे कळून येतं”, असं तुषार गांधी यांनी म्हंटलं.
महत्वाच्या बातम्या :
- International Men’s Day | जागतिक पुरुष दिनाची सुरुवात केव्हा आणि कुठे झाली?, जाणून घ्या
- Neelam Gorhe | “हे तर चिंटूचे…”, नारायण राणेंच्या टीकेला नीलम गोऱ्हेंचं प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | “हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व…”; पुण्यातील ‘त्या’ प्रकारावरुन ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावलं
- IPL 2023 | MI मध्ये परतणार ‘हा’ खूंखार बॉलर
- Sanjay Raut | “स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी…”; संजय राऊतांचा रणजीत सावरकरांवर निशाणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.