Chitra Wagh | “प्यार से जोडने आये हो या नफरत फैलाने?”; चित्रा वाघ यांचा राहुल गांधींना खोचक सवाल

Chitra Wagh |  मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलंय.  राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते यांच्या पाठोपाठ मनसेकडूनही राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर निषेध व्यक्त केला जातोय. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आपण राहुल गांधींच्या मताशी सहमत नसल्याची भूमिका मांडली आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राहुल गांधींना ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे. तसेच, त्यांनी इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला आहे.

“रागां म्हणतात की ही त्यांची भारत जोडो यात्रा.. नफरत से नहीं तो प्यार से जोडो. ते स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी भूमी महाराष्ट्रात येतात आणि देशाला अभिमान वाटावा अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावानं विखारी टीका करतात. वाद उत्पन्न करतात. किती हा विरोधाभास?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणतात कि, “प्यार से जोडने आए हो या नफरत फैलाने? अर्थात रागांकडून कोणती अपेक्षा करणार? त्याला वैचारिक अधिष्ठान असावं लागतं. त्यांच्या आजी इंदिराजी यांनी सावरकरांद्दल आदर व्यक्त करून गौरवोद्गार काढले होते.”

काय म्हणालेत राहुल गांधी?

सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. त्यांनी काँग्रेसविरोधात ब्रिटिशांसोबत काम करण्याचं मान्य केलं होतं. तसेच, ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.