Chitra Wagh | “प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे गिधाड तुम्ही…”; चित्रा वाघांचा संजय राऊतांवर घणाघात

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आज समृद्धी महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या अपघातावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Don’t do politics by accident – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “अहो सर्वज्ञानी राऊत..अपघातावरून राजकारण करू नका. हे उद्धव ठाकरेचं घरकोंबडे सरकार नाही, शिंदे-फडणवीसांचं तत्पर सरकार आहे. घटना घडल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी घटनास्थळी गेलेत.”

“प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे गिधाड तुम्ही… तुम्ही काय सांगताय, संवेदनशीलता नि असंवेदनशीलता.. पत्राचाळीत गैरव्यवहार करून मराठी माणसाला लुटताना तुमची संवेदनशीलता कोणत्या बाजारात विकली होती? कोविड कंत्राटात भ्रष्टाचार करताना संवेदनशीलता खुंटीला टांगून ठेवली होती का ? महिलेला शिवीगाळ धमक्या देतानाही कुठं गहान ठेवली होती तुमची संवेदनशीलता?”, असही त्या (Chitra Wagh) या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर झालेल्या (Chitra Wagh) अपघातावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला होता. ट्विट करत संजय राऊत म्हणाले, “अत्यंत असंवेदनशील सरकार. देवेंद्रजी एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना? राजकीय उखाळ्या पाखाळ्या कमी करा. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/4395VGG