Chitra Wagh | “… म्हणून नियती तुमचा सुड उगवतेय”; चित्रा वाघांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोचरी टीका केली होती. सोमवारी (10 जुलै) नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “उद्धव ठाकरे जी खरं बोलताय, काळ हा निघृण असतो…हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला माहित असणार…बघा ना तुमच्याकडे काय नव्हतं..?? पद पैसा मान सन्मान विचारधारा…जोपर्यंत भाजप सोबत तुम्ही होतात तोपर्यंत सगळं होतं.. पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या लालसेनं देवेंद्रजींना दगा दिलात. तेव्हा पासून नियती तुमचा सूड उगवतेय. तुम्हाला दारोदार फिरावं लागत आहे यावरून तरी ओळखा कलंक कोण आहे.”
उद्धव ठाकरे जी खरं बोलताय,
काळ हा निघृण असतो…
हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला माहित असणार….@uddhavthackeray
बघा ना तुमच्याकडे काय नव्हतं..??
पद पैसा मान सन्मान विचारधारा…जोपर्यंत भाजप सोबत तुम्ही होतात तोपर्यंत सगळं होतं..
पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या लालसेनं…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 11, 2023
I never thought that my tainted word would be so effective – Uddhav Thackeray
दरम्यान, या वादावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली (Chitra Wagh) आहे. ते म्हणाले, “कलंक या शब्दांमध्ये एवढ लागण्यासारखं काय? मात्र, त्यांना हा शब्द खूप जास्त लागला आहे. माझा कलंकित शब्द एवढा परिणामकारक असेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आमच्यावर आरोप करणारे आता स्वतः त्यांच्या (राष्ट्रवादी) मांडीला मांडी लावून बसले आहे. सरकारचं जनतेच्या प्रश्नांकडं लक्ष नाही. त्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.”
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली (Chitra Wagh) आहे. ते म्हणाले, “आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर आत्ताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झाला आहे. या गोष्टीचं मला अत्यंत दुःख आहे. त्यामुळं त्यांना कदाचित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा लागणार आहे. त्यांची मानसिक स्थिती पाहून त्यांच्याकडं दुर्लक्ष करायला हवं. त्याचबरोबर आपण सगळ्यांनी त्यांची मानसिक स्थिती समजून घ्यायला हवी.”
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | “राष्ट्रवादीनंतर लवकरच काँग्रेस आमदारांचा नंबर…”; रोहित पवारांचं खळबळजनक विधान
- Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंवर आजच्या राजकीय परिस्थितीचा विपरीत परिणाम झालायं – देवेंद्र फडणवीस
- Chitra Wagh | तुमच्यासारख्या भामट्यांमुळे राजकारणाचा दर्जा खालवलायं; चित्रा वाघांनी संजय राऊतांना धारेवर धरलं
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांना ‘कलंक’ हा शब्द एवढा का लागला? – उद्धव ठाकरे
- Chandrashekhar Bawankule | “कलंकित करंटा उद्धव ठाकरे…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
Original NEWS SOURCE – https://bit.ly/44kzUNj
Comments are closed.