Chitra Wagh | संजय राठोड प्रकरणी माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास – चित्रा वाघ

Chitra Wagh | सांगली : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झालेले संजय राठोड शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत. संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलने केली होती. त्यात चित्रा वाघ अग्रेसर होत्या. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यामुळे मोठी टीका होत आहे. तर विरोधक भाजप नेत्या चित्रा वाघ यांना प्रश्न विचारत आहेत. आज सांगलीत बोलताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.

चित्रा वाघ म्हणाल्या, “मंत्री संजय राठोड प्रकरणी माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. माझा लढा अद्यापही सुरूच आहे. माझी जेवढी इच्छाशक्ती आहे तेवढे मी लढत आहे. ज्यावेळी त्या मुलीवर अन्याय झाला तेव्हा आता प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आवाज का उठवला नाही?. संजय राठोड यांना क्लीनचिट ही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.”

संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, “पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे.”

काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आपली जीव दिला होता. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात उघड झाले होते. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटला होता. या प्रकरणानंतर संजय राठोड नॉट रीचेबल होते.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.