Chitra Wagh | “सुप्रिया सुळेंवर काय वेळ आलीये?”; चित्रा वाघ यांनी केला ‘तो’ व्हिडीओ शेअर

 Chitra Wagh | मुंबईः  पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली होती. मला मोदींची काळजी वाटते असं म्हणत त्यांनी टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पारगाव मेमाणे येथील शाळेत संविधान कट्ट्याचं उद्घाटन केलं. सुप्रिया सुळेंच्या भाषणात त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. या वक्तव्याचा व्हिडिओ चित्रा वाघ यांनी ट्विट केलाय. बोलत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना घरी गेल्यानंतर पालकांना मतदान करायला सांगा, असं सांगितलं. यावरून चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर काय वेळ आली आहे? आपल्याला मतदान करा, असा निरोप ज्ञानार्जन करण्यासाठी आलेल्या चिमुरड्यांजवळ द्यावा लागतोय, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळेंचं वक्तव्य काय?

“नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना पळायला लागते. ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावे लागते. भाजपकडे मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही”, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.