Chitra Wagh | ही आहे राष्ट्रवादी काँग्रेसची असली नियत, थेट माऊली विठ्ठलाच्या चेहऱ्यावरच बोकड – चित्रा वाघ

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कॅलेंडरची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र चालवलं आहे.

A picture of a buck has been printed on the idol of Shri Vitthala

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कॅलेंडरचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा फोटो एका कॅलेंडरचा आहे. या कॅलेंडरमध्ये श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर बोकडाचं चित्र छापण्यात आलेलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात (Chitra Wagh) मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.

या प्रकरणावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “ही आहे राष्ट्रवादी काँग्रेसची असली नियत, थेट माऊली विठ्ठलाच्या चेहऱ्यावरच बोकड..! हे यांचे वारकरी प्रेम..! @supriya_sule करावा तेवढा निषेध कमी !”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कॅलेंडरची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विठ्ठलाच्या फोटोवर बोकडाचा फोटो ही कॅलेंडर प्रिंट करताना झालेली चूक आहे? की हे मुद्दाम करण्यात आलं आहे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात (Chitra Wagh) उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CPX1Db