Chitra Wagh | “…हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान”; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांचा खोचक टोला 

Chitra Wagh | मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेली वक्तव्ये तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणारी वक्तव्ये यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. परंतु, संजय राऊत यांच्या बोलण्यातील चूक शोधत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचं म्हंटल. याचा व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.

यासोबतच, लो कर लो बात, सर्वज्ञानी संजय राऊत जी म्हणताहेत “बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला” अहो, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान. संपादक इतका अज्ञानी कसा राहू शकतो? भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला इतके सामान्य ज्ञान असू नये. महापुरूषांचा असा अपमान तुम्ही करायचा आणि स्वतःचं मोर्चे काढायचे मुर्ख समजू नका. महाराष्ट्र तुम्हाला पुरतां ओळखून आहे तुमचा जाहिर निषेध”, असे टीकास्त्र चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर सोडले.

संजय राऊत यांचं वक्तव्य काय?

लोकशाहीमध्ये असे घडु नये. पण, असे घडतय. ज्या महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ज्याने लोकशाही जन्माला घातली. त्या महाराष्ट्रात जे घडतय. ते महाराष्ट्राचे दुर्देव आहे. महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतांचा जो अपमान घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का?, असा सवाल राऊतांना विचारला होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.