Cholesterol | कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Cholesterol | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलती जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांश लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येला सामोरे जावे लागते. निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात (Cholesterol Control) राहणे खूप महत्त्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात. आहारात या गोष्टींचा समावेश केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात.

आले (Ginger-For Cholesterol Control)

आल्याचा वापर जवळपास प्रत्येक स्वयंपाक घरात केला जातो. आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिमाइक्रोबियल गुणधर्म आढळून येतात, जे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. आल्याचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी तुम्ही चहामध्ये आल्याचे समावेश करू शकतात.

हळद (Turmeric-For Cholesterol Control)

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हळदीमध्ये अँटिइफ्लिमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन कंपाऊंड शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर हळदीचे नियमित सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसांच्या आजाराचा धोका कमी होतो.

दालचिनी (Cinnamon-For Cholesterol Control)

दालचिनी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. दालचिनीमध्ये आढळणारे सिनामल्डीहाइड आणि सिनामिक ॲसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. दालचिनीचे नियमित सेवन केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील पदार्थांचे समावेश करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

बीपी नियंत्रणात राहतो (BP remains under control-Mango Juice Benefits)

आंब्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळून येते, जे बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आंब्याचा रस प्यायल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांवर दबाव पडत नाही, परिणामी हृदयविकाराचा झटका आणि इतर आजार होण्याची शक्यता कमी होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Mango Juice Benefits)

आंब्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात कॅरोटीनोइड्स आणि विटामिन ए आढळून येतात, जे तुमच्या दृष्टीसाठी चांगले ठरू शकते. यामध्ये आढळणारे विटामिन ए अँटीऑक्सीडेंट म्हणून काम करते आणि रेटिनाचा ऑक्सिडेटिव्ह कमी करण्यास मदत करते. आंब्याच्या रसाचे सेवन केल्याने मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.