Cholesterol Control | कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Cholesterol Control | टीम महाराष्ट्र देशा: निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकारापासून ते मधुमेहापर्यंतच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात. आहारामध्ये या गोष्टींचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासह आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही खालील फळांचा आहारात समावेश करू शकतात.

केळी (Banana For Cholesterol Control)

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीचा समावेश करू शकतात. केळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पोटॅशियम आढळून येते, जे कोलेस्ट्रॉल आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित केळी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील सुधारू शकते. त्यामुळे आहारात केळीचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

अननस (Pineapple For Cholesterol Control)

अननसामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. त्याचबरोबर अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे तत्व आढळून येते, जे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. अननसाचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता देखील कमी होते. अननसाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकतात.

सफरचंद (Apple For Cholesterol Control)

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराचा सफरचंदाचा समावेश करू शकतात. सफरचंदामध्ये विरघळणारे फायबर आढळून येते, जे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सफरचंदामध्ये पॉलिफेनॉल असतात, जे उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात. त्याचबरोबर सफरचंदाचे सेवन केल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील फळांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पोट थंड राहते (Stomach remains cold-Poppy Seeds Benefits)

उन्हाळ्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते. त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये पोट दुखी, पोटात जळजळ होणे इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही खसखसचे सेवन करू शकतात. दररोज खसखस खाल्ल्याने पोट थंड राहते.

तणाव कमी होतो (Reduces stress-Poppy Seeds Benefits)

खसखसमध्ये अँटीडिप्रेसेंट गुणधर्म आढळून येतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही तणाव किंवा चिंतेमध्ये असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात खसखस समावेश केला पाहिजे. रोज रात्री झोपण्यापूर्वी खसखस खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी खसखसचे सेवन केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या