InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

 लंडनमध्ये ख्रिस गेल यांनी घेतली विजय मल्याची भेट

लंडनमध्ये वेस्ट इंडिजचा धडकाबाज खेळाडू ख्रिस गेल याने विजय मल्याची भेट घेतली. विजय मल्याच्या भेटीचा फोटो गेलने सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी गेल आणि मल्याला चांगलेच ट्रोल केले. विजय मल्यानेही गेलने पोस्ट केलेल्या फोटोला रिट्विट करत खास मेसेज लिहिला आहे. यामध्ये तो म्हणतोय की, गेल्या वर्षाभरापासून मी बँकला पैसे द्यायला तयार आहे. गेल्या वर्षभरापासून मी बँकेला सर्व पैसे द्यायला तयार आहे. बँक पैसे का घेत नाही, हे त्यांनाच विचारा आणि त्यानंतर तुम्हीच ठरवा नेमकं चोर कोण आहे.

इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषकाचा थरार सुरू आहे. वेस्ट इंडिज संघाचे स्पर्धेत आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यानंतर युनिव्हर्स बॉसने विजय मल्याची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply