InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Christmas Special: जाणून घ्या नाताळ विषयी काही खास गोष्टी

- Advertisement -

आज नाताळमुळे देशभरात सर्व ख्रिस्ती बांधवांसह सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण आहे. नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून 25 डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. नाताळ म्हटले की भेट वस्तू, सांता, मिठाया, केक, चर्चची भेट याबरोबरच ख्रिसमस ट्री हवेच.

खरा सांता क्लॉज कोण? 

सध्याच्या युगात सांता क्लॉज खिसमसचा प्रमुख घटक. त्याच्याशिवाय ख्रिसमस अपूर्ण मानला जातो. मात्र सांताचे हे आधुनिक रूप १९ व्या शतकात अस्तित्वात आले, त्यापूर्वी हे असे नव्हते. आजपासून दीडहजार वर्षांपूर्वी जन्मलेले संत निकोलस यांना खरा सांता आणि सांताचे जनक मानले जाते.

- Advertisement -

संत निकोलस कोण होते? 

संत निकोलस यांचा जन्म तिसर्‍या शतकात प्रभू येशुंच्या मृत्युनंतर २८० वर्षांनंतर मायरा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांची प्रभू येशुंवर श्रद्धा होती. मोठे झाल्यानंतर ते ख्रिश्चन धर्माचे पुजारी आणि नंतर बिशप बनले. गरजूंना आणि लहान मुलांना गिफ्ट देण्याची त्यांना आवड होती. संत निकोलस हे सर्व गिफ्ट मध्यरात्रीच देत होते, कारण गिफ्ट देताना कोणी आपल्याला पाहू नये अशी त्यांची इच्छा होती. स्वतःची ओळख ते कोणासमोरही आणू इच्छित नव्हते.

 ख्रिसमस ट्री परंपरा कशी आली? 

ख्रिसमस ट्री ची परंपरा जर्मन लोकांनी सुरू केली असे मानतात. १६ व्या शतकातील संत मार्टिन ल्युथर हे पहिले व्यक्ति होते ज्यांनी आपल्या घरात ख्रिसमस ट्री सजवला होता. पूर्वीच्या काळी ओक झाड ख्रिसमस ट्री म्हणून सजवायचे. परंतु कालानुरूप ख्रिसमस ट्री चे स्वरूप बदलत गेले आणि आता प्लास्टिक आणि विविध स्वरुपात ख्रिसमस ट्री उपलब्ध होतो.

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.