InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

लोकसभेनंतर आता बुधवारी नागरिकत्व सुधारणा विधेयकाची राज्यसभेत परीक्षा

लोकसभेत बहुमतानं मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाची आता राज्यसभेत कसोटी लागणार आहे. उद्या (बुधवारी) हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत भाजपाच्या सर्वात जास्त जागा असल्या तरी भाजपकडे स्वतंत्रपणे बहुमत नाही. मात्र एनडीएतल्या मित्रपक्षांच्या मदतीनं भाजप हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजपनं आपल्या सर्व खासदारांना आज आणि उद्या राज्यसभेत हजर राहण्यासाठी व्हिप बजावलाय.

लोकसभेत तब्बल आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री १२.०० वाजता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. परंतु, दीर्घकाळ चर्चा मात्र लोकसभेत चालली. मतदानावेळी विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली.

Loading...

‘मोदी सरकारच्या काळात देशातील अल्पसंख्याक समाजात कोणतीही भीती नाही. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही. केंद्र सरकार सर्वांचे संरक्षण करेल’ असं यावेळी अमित शाह यांनी लोकसभेत आश्वासन दिलंय. हे विधेयक घटनेचे उल्लंघन करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तसंच विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर टीकाही केली.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.