InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

स्वच्छता मोहिमेत वारकरी संप्रदायाची भूमिका महत्त्वाची – हरिभाऊ बागडे

स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर आहे. ही जनजागृती करण्यात वारकरी संप्रदायाची भूमिका महत्त्वाची होती, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे  केले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छतेचा महाजागर’ या कार्यक्रमात श्री. बागडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर,राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील तसेच संत साहित्याचे अभ्यासक,प्रवचनकार, कीर्तनकार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. बागडे म्हणाले, स्वच्छतेचा महाजागर या कार्यक्रमातून वारकरी संप्रदायामार्फत विद्यार्थ्यांचे मन घडविण्याचे काम होणार असून त्यातूनच स्वच्छतेविषयी जागृतीचेही काम करण्यात येईल. या जागृतीतूनच विद्यार्थ्यांकडून कायमस्वरुपी स्वच्छता राहण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.