‘शासकीय नोकरभरतीत महापोर्टल बंद करा’; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

- Advertisement -
महाविकास आघाडीच्या सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या निर्णयांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यात आता शासकीय नोकरभरतीत महापोर्टल हे डिजीटल व्यासपीठ मददगार न ठरता अडथळा ठरतं आहे. म्हणून ते बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील संवाद दौऱ्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर आमचं सरकार आलं की महापोर्टल बंद करू असं आश्वासन सुळे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मागील सरकारने शासकीय नोकर भरतीसाठी हे पोर्टल सुरू केलं होतं. पण यामध्ये पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करण्यात यावं अशी मागणी पत्राद्वारे सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Loading...
Related Posts
'40 हजार कोटींसाठी फडणवीसांनी 80 तासांचे मुख्यमंत्रीपदाचे केले नाटक' @inshortsmarathi https://t.co/0jVYGfvYsR
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) December 2, 2019
- Advertisement -
Loading...
'….तेव्हा जयंतराव कुठे गेले होते'; हरिभाऊ बागडे यांचा जयंत पाटलांना सवाल @inshortsmarathi https://t.co/3bft1ylhLI
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) December 2, 2019