‘सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा’; बच्चू कडू यांची मागणी

मधल्या काळात बंद झालेल्या सिंचन घोटाळ्याच्या फायली पुन्हा ओपन करून या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, अशी मागणी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. मधल्या काळात सिंचन घोटाळ्याच्या फायली बंद झाल्या. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे.

सिंचनाची अवस्था विदर्भ-मराठवाड्यात खराबच आहे. मराठवाडा-विदर्भात सिंचनाचा अनुशेष कमी झालेला नाही. माझ्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात किमान आठ ते नऊ प्रकल्प रेंगळाले आहेत, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यासोबतच पुढचे सहा महिने मंत्री, आमदार, आणि वर्ग-१ च्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.