Clove Water | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला सुंदर, निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्यामुळे त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यासाठी बहुतांश लोक ब्युटी ट्रीटमेंट घेतात किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या सर्व गोष्टी त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही लवंगाच्या पाण्याचा वापर करू शकतात. लवंगामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला पाच ते सहा लवंगाच्या कळ्या पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवाव्या लागेल. त्यानंतर सकाळी तुम्हाला त्या पाण्याने तुमचा चेहरा धुवावा लागेल. नियमित लवंगाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला खालील फायदे मिळू शकतात.
एक्ने दूर होतात (Acne goes away-Clove Water Benefits)
चेहऱ्यावरील एक्नेची समस्या दूर करण्यासाठी लवंगाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये आढळणारे अँटिस्पेक्टिक आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म चेहरा स्वच्छ करतात आणि चेहऱ्याला संसर्गपासून दूर ठेवतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि चेहरा चमकदार बनवण्यासाठी लवंगाचे पाणी फायदेशीर ठरू शकते.
चेहऱ्याची चमक वाढते (The glow of the face increases-Clove Water Benefits)
नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी लवंगाच्या पाण्याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. लवंगाच्या पाण्यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेचा रंग साफ करण्यास मदत करतात. नियमित लवंगाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.
चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात (Wrinkles on the face are removed-Clove Water Benefits)
चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी लवंगाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. लवंगाच्या पाण्याचा नियमित वापर केल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढू शकते. त्याचबरोबर लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने चेहरा दीर्घकाळ निरोगी राहू शकतो.
लवंगाच्या पाण्याच्या मदतीने चेहऱ्याच्या वरील समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेल फळाचा रस प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.
पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Bel Juice)
बेलफळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. बेलफळाच्या सरबताचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने गॅस, ऍसिडिटी, अपचन, बद्धकोष्टता यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी बेलफळाचा ज्यूस प्यायल्याने गॅस्ट्रिक अल्सरची लक्षणे कमी होऊ शकतात.
डायबिटीज नियंत्रणात राहतो (Diabetes remains under control-Bel Juice)
तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल तर सकाळी रिकाम्या पोटी बेलफळाच्या ज्यूसचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बेलफळामध्ये आढळणारे गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बेलफळाचे सरबताचे सेवन केले पाहिजे.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Anjeer | केसांची काळजी घेण्यासाठी अंजीराचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Job Opportunity | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Fungal Infection | फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज