InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

दालन, फर्निचरसह इतर साहित्य परत करण्याचे माजी मुख्यमंत्र्यांना आदेश

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्र्यांसह सर्व राज्य आणि मंत्र्यांच्या पदाचा कार्यभार संपुष्टात आल्याचं परिपत्रक जारी झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व विभागातील मंत्र्यांचे दालन, कार्यालयीन नोंद वह्या, फर्निचर इत्यादींची आवराआवर करण्याच्या आणि ताबा सुपूर्द करण्याचा आदेश यात देण्यात आला आहे.

दालन/कार्यालयतील जडवस्तू, लेखनसामग्री, टपाल तिकीटे, रजिस्टर, हजेरीपट ,  मुख्यालय आरक्षण पुस्तिका, मंत्र्यांचे वेतन आणि प्रवास खर्चाच्या प्रती, मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल/ प्रमाणपत्र, मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, दालन/कार्यालयातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य या सर्व गोष्टी परत करण्याचे आदेश परिपत्रकात देण्यात आला आहे.

 

 

Loading...

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता राज्याचा कारभार राष्ट्रपतींच्या देखरेखीत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पाहणार आहेत. प्रशासकीय पातळीवर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

- Advertisement -

 

प्रशासकीय पातळीवर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व विभागाचे सचिव, प्रधान सचिव आणि अधिकारी मुख्य सचिव अजॉय मेहता यांना रिपोर्ट करतील. यासोबत मंत्र्यांचे दौरे, बैठका बंद होणार आहे. लोकप्रतिनिधींना क्षेत्रीय प्रशासकीय यंत्रणांना लोकप्रतिधींना आदेश देता येणार नाहीत.

सात दिवसात सरकारी निवासस्थान सोडा, केंद्र सरकारची माजी खासदारांना तंबी

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.