मालाड इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाडच्या पश्चिमेला असलेल्या मालवणी भागात चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन विचारपूस केली आहे. तसेच, शासनातर्फे मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना ५ लाखांची मदतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम परिसरातील मालवणी भागात इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ७ जण जखमी झाले. त्यांच्यावर कांदिवली परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपचार घेत असलेल्या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

यावेळी त्यांच्यासोबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More