“मुख्यमंत्री 15 मिनिटं बाहेर येतात अन् लगेच घरात जातात, आमची पण लग्न झाली आहेत पण…”

नांदेड : सध्या राज्यात देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही देगलूरमध्ये ठाण मांडून आहेत. भाजपा उमेदवाराच्या प्राचारार्थ भाजपा नेते नितेश राणे यांची कुशहावाडी येथे काल (रविवार) जाहीर सभा झाली. या सभेत राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

नितेश राणे म्हणाले कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत चुकून आलेच तर 15 मिनिटांनी पुन्हा घरात जातात, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. किती बायकाेवर प्रेम करायचे यालाही मर्यादा आहेत. आमची काय लग्न झाली नाहीत? एकाचेच लग्न झाले आहे का महाराष्ट्रात आणि ताेच बाहेर येत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना नितेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, अतिवृष्टीच्या काळात नुकसान झालेल्या शेतक-यांना महाविकास आघाडी सरकारने काेणत्या ही प्रकारची मदत केली नाही. पीक विम्याच्या कंपन्यांनी देखील शेतक-यांना पाने पुसली आहेत. पीक विमा कंपन्यांनी रस्त्यावर आणून त्यांना वठणवीर आणू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहाेत. जे बाेलताे ते करताे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा