InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

युतीचं लवकर कळेल, राणेंच्या प्रवेशाचा निर्णयही योग्य वेळी – मुख्यमंत्री

- Advertisement -

निवडणूक येतील,जातील पण देशाचे विषय मांडावेच लागतील. युतीची चिंता जशी शिवसेनेला आहे तशीच आम्हालाही आहे. युतीचं लवकर कळेल. आम्ही निर्णय घोषित करू. तसेच नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाचा निर्णयही योग्य वेळी घेऊ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

Loading...

कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि मोदी सरकारचे आभार मानले आहेत. उद्योग जगतासाठी घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले. याचा नक्कीच देशातील कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. 3 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बजेटमध्ये सादर केले ते फायद्याचे आणि आता जे निर्णय घेतलेत ते अधिक फायद्याचे असेही मुख्यमंत्री म्हणाले

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.