InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्र्यांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावायला पण वेळ नाही – धनंजय मुंडे

मंत्रालयाच्या इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासंदर्भात वर्षभरापूर्वी प्रशासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली. परंतु अद्याप हा प्रस्ताव प्रलंबित पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यासाठी वेळ नाही का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

मुंडे म्हणाले की, ज्या इमारतीतून राज्याचा कारभार पाहिला जातो, त्या शासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे तैलचित्र लावल्यास त्यांचा उचित सन्मान होणार आहे. परंतु यासाठी मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत. संविधान दिनाचे औचित्य साधून आजच डॉ. बाबासाहेबांचे व संविधानाच्या प्रास्ताविकाचे तैलचित्र मंत्रालय इमारतीत लावावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.