CM Eknath Shinde | ठाकरें नंतर शिंदे गटाची ढाल तलवार वादाच्या भोवऱ्यात, शीख समाजाचा आक्षेप

मुंबई : शिवसेना पक्षाच्या वादानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देत मशाल हे चिन्ह. या चिन्हावर आक्षेप घेतला असून च्च न्यायालयात हे प्रकरण गेलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं देत ढाल आणि तलवार चिन्ह दिलं आहे. अशातच आता या चिन्हावर सुद्धा शीख समाजाने आक्षेप घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या ढाल तलवार चिन्हावर आक्षेप –

खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्याने त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसेच ढाल तलवार हे चिन्ह पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंट यांच्याकडे होतं. मात्र हा पक्ष २००४ ला यादीतून वगळ्यात आला म्हणून शिंदे गटाला दोन तलवार आणि एक ढाल हे चिन्ह मिळालं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर आक्षेप –

उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हाविरोधात दिल्लीच्या उच्च न्यायालयात समता पार्टीने एक याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये आणखिन वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. ही याचिका समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल (Uday Mandal) यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली आहे. त्यावेळी उदय मंडल यांनी सांगितले की, अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचा उमेदवारही निवडणुक लढवणार होता. परंतू निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’चिन्ह दिल्याने आमच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.

तसेच, समता पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या तृणेश देवळेकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावरून भाष्य केलं होतं. 1994 सालापासून हे राष्ट्रीयकृत चिन्ह आमच्या पक्षाचं असल्याचा दावा यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाला ईमेलच्या माध्यमातून माहिती कळवली असून हे चिन्ह आम्हाला देण्यात यावं अशी मागणी तृणेश देवळेकर यांनी केलीय. इतकेच नाही तर या चिन्हासाठी थेट न्यायालयामध्ये जाण्याचा इशाराही समता पार्टीने दिला असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.