मुख्यमंत्री-फडणवीस बंद दाराआड भेट; शिवसेनेचा बडा मंत्री म्हणाला, ‘महाराष्ट्राची हीच इच्छा’

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. एकीकडे राज्यात शिवसेना आणि राणे वाद चांगलाच पेटला आहे. या वादात भाजपही राणेंच्या समर्थनार्थ उतरली. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं माहिती समोर आली होती. यानंतर राज्यात या भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर काल सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व पक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा होती. या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं होत. यानंतर या भेटीवर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आलीय.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी बंद दाराआड चर्चा झाली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी अशी भेट होत असेल तर महाराष्ट्राची हीच इच्छा आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा भेटी होत असेल तर त्यात गैर नाही, असे विधान सामंत यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा