InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा केला सुपूर्द

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे फडणवीसांनी राजीनामा सुपूर्द केला असून राजीनामा देताना भाजपाचे महत्वाचे नेतेदेखील उपस्थित होते. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असताना तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

- Advertisement -

Loading...

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच मंत्रिमंडळही बरखास्त झालं आहे. आता राज्यपाल नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार चालवा, अशी विनंती करू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची दाट शक्यता आहे. विधीमंडळाचे सचिव अनंत कळसे म्हणाले की, नवं सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना अधिकार दिले जातील, मात्र त्यांना कोणतेही धोरणात्मक अधिकार मिळणार नाहीत.  महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात आला असून आज रात्री 12 वाजता विधानसभेची मुदत संपत आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत आहेत. याद्वारे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या नाट्यावर पडदा पडण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.