InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बचतगटासाठी शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा – मुख्यमंत्री

जीवनोन्नती अभियानाच्या ‘उमेद’मधून जिल्ह्यातील 1 हजार 320 गावात 17 हजार बचतगटांची निर्मिती करण्यात आली आहे. या बचतगटांना 123 कोटींचा फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात 254 तालुक्यात उमेदची व्याप्ती आहे. या तालुक्यात दोन लाख 65 हजार महिलांचे बचत गट कार्यरत आहेत. जवळपास 35 लाख कुटुंब या अभियानात जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात परिवर्तन घडून येत आहे. बचतगटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड संपूर्ण होत आहे. कर्जफेडीत महिला प्रामाणिक असल्यामुळे त्यांना आता व्यवसाय उद्योगासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात येईल. त्या माध्यमातून विशेष योजना राबविण्यात येतील. जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी देखील विशेष पारधी विकास अधिकारी नियुक्त केला आहे. त्या माध्यमातून पारधी विकासाला गती मिळालेली आहे. जिल्ह्यातील आदिवासींचे 361 कोटीचे खावटी कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच त्यांना मुबलक अन्नधान्य पूरवठा करण्यात येईल. त्यामुळे त्यांना खावटी कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. सिंचन व रस्ते विकासात मोठे काम झाले आहे. वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम पूर्णत्वास येत आहे. जिल्ह्यातील कापसावर याच ठिकाणी प्रक्रिया करून कापूस ते कापड निर्मितीसाठी येथेच एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क उभारण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply