शरद पवारांनी घेतली दुष्काळ प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट

मराठवाड्यात दिवसभर भारनियमन केले जाते आणि रात्री बेरात्री पाण्याचे टँकर आणले जातात. लोक रात्री दोन-तीन वाजता उठून पाणी भरायला जातात. हे तातडीने थांबवा आणि चारा छावण्यांचे दर 119 रुपये करा, अशा मागण्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या. त्यावेळी  चाऱ्याचे दरही लवकरच वाढवले जातील, राज्यात रात्रीचे टॅँकर कुठेही चालू दिले जाणार नाहीत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन दुष्काळाबाबत चर्चा केली.

पार पडलेल्या या बैठकीला अजित पवार, राणा जगजीत सिंह पाटील, दीपक आबा साळुंखे हे व इतर नेते उपस्थित होते. दुष्काळाबाबत झालेल्या बैठकीत दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, पाण्याचे योग्य नियोजन, जायकवाडी धरणातील पाणी, फळबाग, छावण्या, दुष्काळी भागात अन्नधान्य नियोजन यासारख्या विषयांवर चर्चा झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा