“समीर वानखेडे प्रकरणी आता मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र”

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले आहेत. समीर वानखेडे यांच्या जन्माच्या दाखल्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तसेच, प्रभाकर साईल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही सईल यांनी केला होता. याचबरोबर सध्या समीर वानखेडेंवर लाचखोरी, जातीचा बनावट दाखला, खंडणी वसुली असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत.
या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार असून ते मोदींकडे काय मागणी करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या
- “नवाब मालिकांचं मोठं वक्तव्य; ‘समीर वानखेडेंवरील आरोप खोटे ठरले तर मी राजीनामा देईन”
- मलिकांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट; मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग
- “सोमय्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही; ते फक्त राज्याला मनोरंजन देण्याचं काम करतात”
- “महाराष्ट्रात होणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात”
- “बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही”