InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये – उद्धव ठाकरे

शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये. शिवसेनेनं आपली सतत आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं याचं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले.

सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदान करणं ही देशभक्ती आहे आणि त्यांच्या विरोधात मतदान करणं हा देशद्रोह आहे, ही मानसिकता बदलायला हवी. या सर्वांपेक्षा देशात राहणाऱ्या जनतेसमोरचे रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक जे लोकसभेत मांडण्यात आलं त्यावर अद्याप स्पष्टता नाही. भारताच्या शेजारी असलेल्या देशांच्या नेत्यांना एक हादरा देणं आवश्यक होतं. त्या देशांमध्ये अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायानंतर त्यांना इशारा देणं आवश्यक होतं. परंतु आता तसं होताना दिसत नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Loading...

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.