InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्र्यांनी गिरीष बापट यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी – धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील बिभिषण माने या दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला पदाचा गैरवापर करत व कायद्याची पायमल्ली करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी परवाना बहाल केला आहे. त्यांनी कर्तव्यात कसून आणि पदाचा गैरवापर केला असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील मुरंबी (अंबाजोगाई) येथील स्वस्त धान्य दुकानाच्या परवाना प्रकरणी निकाल देतांना, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंत्री हे जनतेचे विश्‍वस्त आणि रक्षक असतात, बापट यांनी कर्तव्यात कसूर केला आहे, पदाचा गैरवापर केला आहे, असे ताशेरे ओढले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply