CNG Car Update | जबरदस्त मायलेजसह कमी किंमतीत उपलब्ध आहेत ‘या’ CNG कार
टीम महाराष्ट्र देशा: देशात दिवसेंदिवस पेट्रोल Petrol आणि डिझेल Diesel च्या किमतीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता लोक पेट्रोल डिझेल टाळण्यासाठी इतर पर्याय शोधत आहे. त्यामध्ये CNG कारचा पर्याय लोकांना एक सर्वोत्तम मार्ग वाटत आहे. कारण CNG वाहने लोकांना अनेक फायदे देत आहे. त्यामध्ये किमती Price पासून मायलेज Mileage पर्यंत सर्वच गोष्टींचा फायदा होतो. कारण पेट्रोल डिझेल कार पेक्षा CNG कार ची किंमत कमी असते. त्याचबरोबर सीएनजी गाड्या चांगले मायलेज देऊन पर्यावरणाची फारशी हानी करत नाही. अशाच काही CNG कारबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
Maruti Suzuki Alto CNG
देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी हॅशबॅक कार Alto चे बेस्ट व्हेरियंट CNG प्रकारात लाँच झाले आहे. मारुतीची Maruti Suzuki Alto CNG कार पेट्रोलवर 22.05 kmpl आणि CNG वर 31.5kmpl प्रमाणित मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर या कारची एक्स-शोरूम किंमत 5,03,000 एवढी असून या कारची ऑन-रोड किंमत 5,55,187 रुपये एवढी आहे.
Maruti WagonR CNG
Maruti WagonR CNG ही मारुतीच्या CNG सेगमेंट मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. विकार दोन CNG पर्याय मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये LXi आणि VXi यांचा समावेश आहे. या कारच्या LXi प्रकारची एक्स-शोरूम किंमत 6,42,500 रुपये एवढी असून याची ऑन-रोड किंमत 7,20,116 रुपये आहे. तर, या कारच्या VXi प्रकारची एक्स-शोरूम किंमत 6,86,00 रुपये एवढी असून याची ऑन-रोड किंमत 7,73,207 रुपये आहे. या कारच्या मायलेज बद्दल बोलायचे झाले तर, ही कार पेट्रोलवर 25.19kmpl आणि CNG वर 34.05kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
Maruti Celerio CNG
Maruti Celerio CNG ही कार कारच्या VXi या CNG प्रकारामध्ये बाजारात उपलब्ध आहे. मारुतीची ही कार पेट्रोलवर 25.24kmpl आणि CNG वर 35.6kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 6,69,000 एवढी असून, या कारची ऑन-रोड किंमत 7,50,968 रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या
- Virat Kohli । पाकिस्तानी चाहत्याने वाळूवर रेखाटलं विराट कोहलीच चित्र
- Rohit Pawar | “हिंमत असेल तर पुरावा द्या..मैदानात बघू”; रोहित पवारांचे ‘या’ नेत्याला आव्हान
- MVA | “नार्वेकर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी…”; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचा शिंदे सरकारला टोला
- SSC Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी बंपर भरती
- MNS | “… तर मुंबई पोखरणारी घुस निघाली”, मनसेचा किशोरी पेडणेकरांना खोचक टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.