नागपूर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे-पालकमंत्री राऊत

कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप टळलेला नसून बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासनातर्फे कोरोनाबाधित रुग्णांसाठी तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे बेसुमार हाल होतायत-विखे पाटील

लॉकडाऊनच्या नवीन नियमांनुसार प्रशासकीय यंत्रणांनी पूर्वीप्रमाणेच परस्पर समन्वय ठेवून कार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागपूर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

Loading...

आशा आणि अंगणवाडीसेविकेचे काम कौतुकास्पद – पालकमंत्री संजय राठोड

नागपूरमधील सततच्या वाढत्या कोरोनाबाधितांच्या प्रादुर्भावानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमावलीचे कठोरपणे पालन करण्यात यावे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने आढावा व समन्वय बैठका घेऊन पुढील कार्यवाही करावी. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र सोडून शासनाने घालून दिलेले नॉर्म्स पाळून इतर भागातील दैनंदिन व्यवहाराबाबतचा यावेळी आढावा घेण्यात आला. घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य आहे. हात धुणे वा सतत सॅनिटाईज करणे, तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक राहणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारांवर कठोर कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.