Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

Coconut Oil | टीम कृषीनामा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोषक तत्वांचा अभाव, खराब जीवनशैली आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरतात. पण ही उत्पादन केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे केस काळे ठेवण्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकतात. खोबरेल तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. खोबरेल तेलासोबत पुढील गोष्टींचा वापर केल्याने केस निरोगी आणि काळे राहू शकतात.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता (Curry leaves And Coconut Oil-For Hair Care)

खोबरेल तेल आणि कढीपत्त्याचा वापर करून केस काळे ठेवता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये दहा ते पंधरा कढीपत्ते मिसळून घ्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला हे तेल कोमट करून घ्यावे लागेल. या तेलाने तुम्हाला केसांना हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर साधारण तीन तासांनी तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील. खोबरेल तेल आणि कढीपत्त्याच्या मदतीने केस निरोगी राहू शकतात.

खोबरेल तेल आणि मेथीचे दाणे (Fenugreek seeds And Coconut Oil-For Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये मेथी दाणे मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये एक चमचा मेथी दाणे टाकून तेल कोमट करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे तेल गाळून घ्यावे लागेल. या तेलाने केसांना नियमित मसाज केल्याने केस निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर या तेलाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालला मिळते.

खोबरेल तेल आणि कांद्याचा रस (Onion juice And Coconut Oil-For Hair Care)

केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेल आणि कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये आवश्यकतेनुसार कांद्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थित उकळून घ्यावे लागेल. हे तेल कोमट झाल्यानंतर तुम्हाला ते केसांना लावावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केस काळे राहतात आणि केसांची वाढही जलद होते.

केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वरील पद्धतीने वापर करू शकतात.त्याचबरोबर केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही खालील पर्यायांचा वापर करू शकतात.

मोहरीचे तेल आणि मेथी (Mustard oil and fenugreek seeds-For Hair Growth)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि मेथीचा वापर करू शकतात. कारण या दोन्हीमध्ये विटामिन ई, अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या दाण्याची पेस्ट तयार करून मोहरीच्या तेलामध्ये मिसळून घ्यावी लागेल. हे तेल तुम्हाला साधारण एक तास केसांना लावून ठेवावे लागेल. एका तासानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागतील.

खोबरेल तेल आणि कोरफड (Coconut Oil and AloeVera-For Hair Growth)

तुम्ही जर केस वाढवण्याचा विचार करत असाल, तर खोबरेल तेल आणि कोरफडीचे मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवश्यकतेनुसार कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण हलक्या हाताने केसांना लावावे लागेल. साधारण एक तास हे मिश्रण केसांवर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस मऊ, लांब आणि चमकदार होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Hing Water | हिंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Ashwagandha | त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी अश्वगंधाचा ‘या’ प्रकारे करा वापर

Negative Calories | ‘हे’ निगेटिव्ह कॅलरीज असलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी करतील मदत

Glycerine | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ग्लिसरीनसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर

Hair Growth | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी करा ‘या’ सोप्या टिप्स फॉलो