Coconut Oil | टीम कृषीनामा: खोबरेल तेल जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. कारण खोबरेल तेल नियमित आपल्या केसांना लावल्याने केस निरोगी राहतात. त्याचबरोबर अनेकजण त्वचेवर (Skin) खोबरेल तेल लावत असतात. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्या कमी होते. या तेलाने त्वचेवरील अनेक समस्या देखील दूर होतात. खोबरेल तेल चेहऱ्यावर सहज पद्धतीने लावता येते. खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्यानंतर एक मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा, असे केल्याने खोबरेल तेलाच्या मदतीने तुमच्या त्वचेवरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्याला खोबरेल तेल लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते. खोबरेल तेलाच्या मदतीने चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या सोडवण्यासाठी खोबरेल तेलाचा पुढील प्रकारे वापर करा.
खोबरेल तेल कसे लावायचे? (How to apply coconut oil?)
रात्री झोपण्यापूर्वी लावा (Apply coconut oil at night before going to bed)
तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करायचे असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल लावू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेल घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटे मसाज करावी लागेल. त्यानंतर सकाळी उठून तुम्हाला चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवावा लागेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होऊ शकतात.
कोरफडीसोबत खोबरेल तेल वापरा (Use coconut oil with aloe vera)
खोबरेल तेल आणि कोरफड दोन्हीही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला अर्धा तास संपूर्ण चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर काही दिवस केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या कमी होऊ शकते.
दही आणि लिंबासोबत खोबरेल तेल वापरा (Use coconut oil with curd and lemon)
त्वचेवरील पिंपल्स कमी करायचे असेल तर तुम्ही खोबरेल तेलासोबत दही आणि लिंबाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेलामध्ये एक चमचा दही आणि दोन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. जास्त लिंबाचा वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे लिंबाचा योग्य प्रमाणात वापर केला गेला पाहिजे.
खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्याने पुढील समस्या दूर होऊ शकतात (Applying coconut oil on the face can cure the following problems)
त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो
नियमितपणे त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने कोरडेपणाची समस्या सहज दूर होऊ शकते. अनेकवेळा त्वचेची झीज झाल्यामुळे चेहऱ्यावर अनेक समस्या निर्माण होतात. खोबरेल तेलाच्या वापराने त्वचेवरील झालेली झीज कमी होऊन, त्वचेला पोषण मिळते.
डाग कमी होतात
तुमच्या चेहऱ्यावर डाग आणि डागांची समस्या निर्माण झाली असेल, तर खोबरेल तेलाचा वापराने ती दूर होऊ शकते. खोबरेल तेलामध्ये आढळणारे गुणधर्म डाग आणि डागांशी निगडित समस्या दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर नियमित खोबरेल तेल त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार राहू शकते. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने एक मिनिट चेहऱ्यावर मसाज करू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या