लातूर महापालिकेच्या पोट निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू

लातूर महापालिकेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होत असून या करीता सोमवारपासून (ता. ९) आचारसंहिता लागू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रमही आयोगाने जाहिर केला आहे. ता. नऊ जानेवारी रोजी या करीता मतदान होणार आहे.

राज्यातील नाशिक महापालिकेच्या दोन, मालेगाव एक, नागपूर एक, पनवेल एक, बृह्नमुंबई एक व लातूर एक अशा सात जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. लातूर महापालिकेच्या प्रभाग ११ अ या जागेसाठी निवडणूक होत आहे. येथील भाजपचे नगरसेवक शिवकुमार गवळी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरीता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी ता. १६ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र आणि स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाची आहे.

ता. १६ ते २३ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असणार आहेत. ता. १६ ते २३ डिसेंबर याच कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ता. २४ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे. ता. २६ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. ता. २७ डिसेंबर रोजी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ता. नऊ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ता. दहा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

सोमवारपासून (ता.९) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता निवडणूक होणाऱया संबंधीत प्रभागात लागू राहणार आहे. मात्र या प्रभागातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवकाला करता येणार नाही. त्यामुळे लातूरमध्ये फक्त प्रभाग ११ मध्ये ही आचारसंहिता लागू राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.