InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महाविद्यालये बेरोजगारांची निर्मिती करणारे कारखाने : तावडे

महाविद्यालये ही केवळ उच्च शिक्षण देऊन बेरोजगारांची निर्मिती करणारी कारखाने झाली आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, आपण पारंपरिक शिक्षणात अडकून पडलो आहोत. असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी’च्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी तावडे बोलत होते.

नागरिकांनी आपल्या मानसिकतेत बदल करून कौशल्य विकासाला हातभार लावला पाहिजे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

 

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.