दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी राज्यवर्धनसिंग राठोड असणार प्रमुख पाहुणे

आजपासून दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय क्रिडामंत्री आणि सूचना व प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड उपस्थित राहणार आहेत.

तसेच पहिल्यांदाच होत असलेल्या दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या ट्रॉफीचेही अनावरण राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते होईल.

या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन आणि स्टार इंडिया यांनी केले असुन त्यांना दुबई स्पोर्ट्स कौन्सिलने पाठिंबा दिला आहे. ही स्पर्धा 22 जून ते 30 जून दरम्यान खेळवली जाणार आहे.

Loading...

या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, कोरिया, केनिया आणि अर्जेंटीना या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. तसेच सलामीचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा आज रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.

तसेच या स्पर्धेसाठी दोन गटात संघांची विभागणी करण्यात आली आहे. यात भारत अ गटात असुन पाकिस्तान आणि केनिया हे दोन देशही या गटात असणार आहेत. तसेच ब गटातून इराण, दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना खेळतील.

या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजय ठाकूरकडे सोपविण्यात आली आहे.

भारतीय संघात चांगले आक्रमण करणारे खेळाडू आहेत. यात दिपक निवास हुडा, परदिप नरवाल, मोनू गोयत, रिशांक देवाडिगा आणि राहुल चौधरी हे रेडर्स आहेत. तर बचाव फळीत सुरेंदर नाडा आणि गिरीश एर्नाक असे खेळाडू आहेत.

या स्पर्धेकडे एशियन्स गेम्सची रंगीत तालिम म्हणुन पाहिले जात आहे.

कबड्डीच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या-

आज भारत-पाकिस्तान सामन्याने सुरु होणार दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा

भारताचा राष्ट्रीय खेळ नेमका आहे तरी कोणता? हाॅकी की कबड्डी?

कबड्डी मास्टर्समध्ये कर्णधार अजय ठाकूर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी उत्सुक

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.